‘तू जाऊन तीन तपं झाली’ : गावमातीतील माणसांच्या सत्त्वाचा शोध घेणारे काव्य
ही दीर्घकविता सत्त्व जपणाऱ्या आई-बा व ‘मी’च्या संघर्षाची कहाणी अभिव्यक्त करते. बहात्तरच्या दुष्काळी परिस्थितीपासून ही कहाणी आरंभ करते. काबाड कष्ट करूनही वेदना, हाल-अपेष्टेचे जगणे वाट्याला आलेली माणसं सत्त्व जपण्याचा वसा घेऊन संघर्षमय जीवन जगतात त्याचे हे काव्य. तीन तपापूर्वी अस्तंगत झालेल्या आईच्या आठवणींचा जागर व संघर्षमय जीवन जगत एकाकी पुढे आलेल्या कवीची कहाणी सांगणारे हे आत्मकाव्य आहे .......